युवा वज्रमुठ फाऊंडेशनचा संघटन प्रोजेक्ट व कार्यकर्त्यांना बळ देणारी योजना-
आपणास कळविण्यात येते की, युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या वतीने आपल्या कोकणातील तसेच महाराष्ट्रामधील युवकांना युवा वज्रमुठ फाऊंडेशन मध्ये सहभागी करून त्यांना सक्रिय कार्यकर्ता तयार करून त्यांच्याकडून प्रभावी समाजसेवा करण्याकरिता, युवा पिढीची ताकद निर्माण करण्याकरिता, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवण्याकरिता युवा वज्रमुठ फाऊंडेशनने अनेक वेगवेगळ्या समित्या निर्माण केलेल्या आहेत, या समित्या निर्माण करण्याचा मूळ हेतू वेगवेगळ्या समित्या मधून अनेक युवा वर्गाला पदाधिकारी म्हणून संधी देणे ज्या युवा वर्गातील बांधवांची आपण पदाधिकारी म्हणून नियुक्ती करत आहोत ते सर्वजण पदाची जबाबदारी स्वीकारून जोमाने काम करत आहेत म्हणूनच वेगवेगळ्या समित्यांचे नियोजन तसेच जिल्हा अध्यक्ष व विविध जिल्हा प्रमुखांना समाजकार्याचा व संघटन निर्माण करण्याकरिता वेगवेगळ्या समित्यांचा उपाय व मार्ग आणि कामाची विभागणी
१) युवा वज्रमुठ फाऊंडेशन कार्यकारणी -
सदस्य नियुक्ती करेल, जिल्हा अध्यक्ष व जिल्ह्यातील समित्यांचे जिल्हाप्रमुख नियुक्ती करेल. जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य हे शिफारस करतील या शिफारसीचा प्रामुख्याने विचार होईल किंवा कोणीही प्रत्यक्ष संपर्क साधला त्याची माहिती घेऊन त्यांचाही विचार होईल आणि सर्व राज्य कोकण आणि जिल्हाभर कार्यकारणी सदस्यांची देखरेख राहील.
२) युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे विभागीय अध्यक्ष-
विभागीय अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष जिल्हा समित्यांचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधून युवा वज्रमूठ फाऊंडेशनच्या अध्यक्षांना कामाचा अहवाल देतील.तसेच जिल्हा अध्यक्ष व जिल्हाप्रमुख यांच्या नियुक्तीसाठी सूचना व शिफारस करतील. सदर शिफारसींचा विचार करता येईल,तसेच संघटना बळकट करण्याकरिता एकता निर्माण करणारी निती ठरविण्याकरिता सहकार्य करतील.
३) युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष -
जिल्ह्याची १५ लोकांची जिल्हा समिती तयार करतील जिल्ह्यातील सर्व समित्यांवर देखरेख व मार्गदर्शन करतील सर्व समित्यांच्या अध्यक्षांची सभा घेतील. गरज भासल्यास सर्व समित्यांच्या सभासदांची सभा घेतील. संघटना बळकट करण्याकरिता एकता निर्माण करणारी निती ठरवतील.
४)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा संपर्क प्रमुख समिती -
जिल्हा संपर्क समिती किमान 11 लोकांची असेल.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्वांच्या ओळखीने व सहकार्याने जिल्हा संपर्क समिती तयार करतील तसेच तालुका संपर्कप्रमुख नियुक्ती करतील.तालुका संपर्कप्रमुख नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा संपर्कप्रमुखांना आहेत.तालुका समिती किमान 11 लोकांची राहील.जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य जिल्हा अध्यक्ष व विविध समित्यांचे जिल्हा प्रमुख यांच्या सहकार्याने समित्या पूर्ण करतील.पुढील निती व सूचना तालुका समित्या पूर्ण निर्माण झाल्यावर आपणांस कळविण्यात येतील.
५) युवा वज्रमुठ फाऊंडेशन संघटन समिती-
जिल्हा संघटन समिती प्रमुख जिल्ह्यातील किमान 11 कार्यकर्त्यांची जिल्हा संघटन समिती तयार करतील. जिल्हा संघटन समिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका संघटन प्रमुख नियुक्ती करतील व प्रत्येक तालुका संघटन प्रमुखांकडून किमान 11 कार्यकर्त्यांची तालुका संघटन समिती निर्माण करतील. या करिता जिल्हा संघटन समिती त्यांना मार्गदर्शन व जमेल तसे सहकार्य करतील.तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य जिल्हा अध्यक्ष व विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेता येईल. पुढील निती आपणांस तालुक्यांची संघटन समित्या तयार झाल्यानंतर कळविण्यात येईल.
६)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा तक्रार निवारण समिती प्रमुख-
जिल्हा तक्रार निवारण समिती किमान 11 कार्यकर्त्यांची असेल. जिल्हा तक्रार निवारण समिती प्रमुख सर्वांच्या ओळखीने आणि सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याची तक्रार निवारण समिती तयार करतील,जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांची आणि विविध समित्यांच्या प्रमुखांची मदत व मार्गदर्शन घेतील.जिल्ह्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणतीही सूचना किंवा लेखी तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन निर्णय दिला जाईल,तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका तक्रार निवारण प्रमुख नियुक्ती करतील.तालुका तक्रार निवारण प्रमुखांना तालुका तक्रार निवारण समिती निर्माण करण्याकरिता मार्गदर्शन व सहकार्य करतील.पुढील निती तालुका समित्या निर्माण झाल्यानंतर कळविण्यात येईल.
७)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा महिला आघाडी प्रमुख-
जिल्हा महिला आघाडी प्रमुख जिल्ह्यातील किमान 11 महिलांची समिती तयार करतील.जिल्हा महिला प्रमुख जिल्हा अध्यक्ष व जिल्ह्यातील कार्यकारणी सदस्यांचे व विविध समित्यांच्या जिल्हाप्रमुखांचे मार्गदर्शन व सहकार्य आणि त्यांच्या ओळखीने महिला जिल्हा समिती तयार करतील. जिल्ह्यातील महिलांच्या समस्या समजून घेऊन महिलांना जमेल तसे मार्गदर्शन व सहकार्य करतील.आणि सर्वांच्या ओळखीने आणि सहकार्याने प्रत्येक तालुक्यात तालुका महिला प्रमुखांची नियुक्ती करतील.प्रत्येक तालुक्यात 11 महिलांची समिती तयार करतील.तालुक्यात महिला समिती तयार झाल्यानंतर संघटनेची पुढील निती व संघटन प्रोजेक्ट आपणास कळविण्यात येईल.
८) युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा युवती प्रमुख-
जिल्ह्यातील जिल्हा युवती प्रमुख जिल्हा युवती समिती तयार करतील, जिल्हा समिती किमान 11 युवतींची असेल.जिल्हा युवती समिती तयार करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य आणि विविध समित्यांच्या प्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची मदत व सहकार्य आणि मार्गदर्शन घेतील.जिल्हा युवती समितीच्या सर्व सदस्यांची मदत व जिल्ह्यातील इतर समित्यांच्या ओळखीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका युवती प्रमुख नियुक्ती करतील व त्यांच्याकडून तालुका युवती समिती तयार करून घेतील.पुढील निती व संघटन प्रोजेक्ट आपणांस तालुका समित्या पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल .
९)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा युवक प्रमुख-
जिल्हा युवक प्रमुख जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सर्व संघटनेच्या समित्यांचे जिल्हाप्रमुख आणि समिती सदस्य आपल्या ओळखीच्या तरुणांना आपल्या संघटनेचे महत्त्व व ध्येय आणि उद्देश समजावून किमान 11 युवकांची जिल्हा युवक समिती तयार करतील.त्याचप्रमाणे सर्वांच्या ओळखीने आणि सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवक तालुकाप्रमुख नियुक्ती करतील.तालुका समित्या तयार झाल्यानंतर आपणास संघटनेचा पुढील प्रोजेक्ट व संघटन निती देण्यात येईल.
१०)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा कायदे सल्लागार समिती-
जिल्हा कायदे सल्लागार समितीचे जिल्हाप्रमुख जिल्ह्यातील वकील बांधवांची जिल्हा सल्लागार समिती किमान 11 वकिलांची राहील. युवा वज्रमुठ फाउंडेशनचे जिल्ह्यातील कार्यकारणी सदस्य जिल्हा अध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व समित्यांचे जिल्हाप्रमुख व सर्व कार्यकारणीच्या सदस्यांच्या ओळखीने व सहकार्याने जिल्हा वकील समिती तयार येईल,तसेच जिल्हा कायदे सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांच्या ओळखीने व सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका कायदे सल्लागार प्रमुख नियुक्ती करतील व त्यांच्याकडून तालुका कायदे सल्लागार समित्या तयार करून घेतीलआणि त्यांना मार्गदर्शन करतील.या संघटनेमुळे युवा वज्रमूठ फाउंडेशन व युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी समाजातील न्यायालयीन दावे व अन्य समस्या आपल्या वकिलांनाच देण्याचे प्रयत्न असतील, म्हणूनच या वकील संघटनेची गरज आहे.
११)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा आरोग्य समिती-
जिल्हा आरोग्य समिती किमान 11 डॉक्टरांची राहील. जिल्हा आरोग्य समितीचे प्रमुख आपल्या ओळखीने किंवा युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी आणि युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध समित्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या ओळखीने व सहकार्याने जिल्हा आरोग्य समिती तयार करतील.तसेच युवा वज्रमूठ फाऊंडेशनच्या ओळखीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका आरोग्य समिती प्रमुखाची नियुक्ती करता येईल आणि तालुका आरोग्य समिती प्रमुखांना मार्गदर्शन व सहकार्य करून तालुका समित्या त्यांच्याकडून निर्माण करून घेता येतील,युवा वज्रमुठ फाऊंडेशन व फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य कोणत्याही वैद्यकीय उपचाराकरिता आपल्याच डॉक्टरांकडे जातील.अशी भूमिका व कृती युवा वज्रमूठ फाऊंडेशनने तयार केली आहे, म्हणूनच या समितीची गरज आहे.
१२)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा व्यवसाय समिती-
युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे जिल्हा व्यवसाय समितीचे प्रमुख जिल्ह्यातील किमान 11 व्यावसायिक बांधवांची जिल्हा समिती ओळखीने किंवा युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य आणि जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकारणी सदस्य ,युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे सदस्य यांचे सहकार्य व मदत आपणास घेता येईल.तसेच जिल्हा व्यवसाय समितींच्या सदस्यांची निवड करता येईल आणि जिल्ह्यातील युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मदत घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व्यवसाय समिती प्रमुखांची नियुक्ती करता येईल व तालुका व्यवसाय प्रमुखांकडून तालुक्यातील व्यवसाय करणारे बांधवांना एकत्र आणून तालुका व्यवसाय समिती तयार करून घेता येईल.ही समिती संघटनेच्या बांधवांना म्हणजेच सदस्यांना शक्य तितके कमी दरात कामे करून देतील किंवा खरेदीत सूट देतील.युवा वज्रमुठ फाउंडेशन आपले पदाधिकारी सदस्य सर्व व्यवहार आपल्याच संघटनेच्या सदस्याकडून करावेत अशी विनंती करतील व कृती करतील, म्हणूनच या समितीची गरज आहे.
१३)युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा नोकरी मार्गदर्शन समिती-
युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे जिल्हा समिती प्रमुख युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य आणि युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तसेच विविध समित्यांचे जिल्हा प्रमुखांच्या मदतीने व सहकार्याने सर्वांच्या ओळखीने जिल्ह्याची किमान 11 लोकांची जिल्हा नोकरी मार्गदर्शन समिती तयार करता येईल तसेच सर्वांच्या मदतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका नोकरी मार्गदर्शन समिती प्रमुख नियुक्त करता येतील तालुका अध्यक्षांच्या ओळखीने व युवा वज्रमुठ फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्याच्या ओळखीने तालुका मार्गदर्शन समित्या तयार करून घेता येतील.या समिती मार्फत युवकांना जिल्हातील स्थानिक विभागात नोकऱ्या मिळवून देण्याचे प्रयत्न असतील तसेंच जेव्हा जेव्हा सरकारी नोकरी भरती येईल,त्याची माहिती व त्याबद्दल मार्गदर्शन देता येईल.
१४) युवा वज्रमुठ फाऊंडेशन जिल्हा शिक्षक समिती-
जिल्हा शिक्षक समिती प्रमुख जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी सदस्य,जिल्हा अध्यक्ष विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख आणि सर्व समित्यांचे पदाधिकारी आणि विभागातील सदस्यांची मदत व सहकार्य घेऊन किमान 11 शिक्षकांची जिल्हा समिती तयार करता येईल,तसेच सर्वांच्या ओळखीने व सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका शिक्षक समिती प्रमुख नियुक्ती करता येईल.तालुका प्रमुखांना सहकार्य करून त्यांच्याकडून तालुका शिक्षक मार्गदर्शन समिती 11 लोकांची करता येईल,तसेच शिक्षकांच्या प्रत्येक गावात ओळखी असतात,त्यांची पालकांमध्ये प्रतिष्ठा असते,म्हणूनच या समितीची गरज आहे.
१५) युवा वज्रमुठ फाऊंडेशन शेती प्रबोधन समिती-
शेती प्रबोधन समितीचे प्रमुख युवा वज्रमुठ फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य जिल्हा अध्यक्ष आणि विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख तसेच सर्व समित्यांचे सदस्य यांच्या सहकार्याने व मदतीने किमान 11 लोकांची जिल्हा शेती प्रबोधन समिती तयार करू शकतात.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका शेती प्रबोधन समिती प्रमुख नियुक्ती करता येतील.किमान तालुक्यात 11 लोकांची शेती प्रबोधन समिती तयार करून घेता येईल,शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या जाणून घेऊन तसेच सरकारी सवलती व सरकारी योजना आणि शेती विषयक आधुनिक पद्धती बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल.
१६)युवा वज्रमुठ फाऊंडेशन क्रीडा समिती-
क्रीडा समितीचे प्रमुख
युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य जिल्हा अध्यक्ष आणि विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख तसेंच सर्व समित्यांचे सदस्य यांच्या सहकार्याने 11 लोकांची जिल्हा क्रीडा समिती तयार करू शकतात.तसेंच जिल्हातील प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा समिती प्रमुख नियुक्ती करता येईल.किमान 11 लोकांची क्रीडा समिती तयार करून घेता येईल, तालुका समित्या तयार झाल्यानंतर आपणास संघटनेचा पुढील प्रोजेक्ट व संघटन निती देण्यात येईल.
१७) युवा वज्रमुठ फाऊंडेशन सांस्कृतिक समिती-
सांस्कृतिक समितीचे प्रमुख
युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य जिल्हा अध्यक्ष आणि विविध समित्यांचे जिल्हाप्रमुख तसेंच सर्व समित्यांचे सदस्य यांच्या सहकार्याने 11 लोकांची जिल्हा सांस्कृतिक समिती तयार करू शकतात.तसेंच जिल्हातील प्रत्येक तालुक्यात तालुका सांस्कृतिक समिती प्रमुख नियुक्ती करता येईल.किमान 11 लोकांची सांस्कृतिक समिती तयार करून घेता येईल, तालुका समित्या तयार झाल्यानंतर आपणास संघटनेचा पुढील प्रोजेक्ट व संघटन निती देण्यात येईल.
समाज सेवा हिच खरी ईश्वर सेवा
माझ्या सर्व फाऊंडेशन चे पदाधिकारी व सदस्य हा संघटन प्रोजेक्ट व आधुनिक निती स्वीकारेल त्या पदाधिकाऱ्यांचे तसेच सदस्याचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे. ज्यांना समाजकारण व राजकारण करायचे आहे, त्यांनी या योजनेनुसार संघटन उभे केल्यास त्यांचे स्वप्न हमखास पूर्ण होईल आपले स्वप्न पूर्ण करण्याचे युवा वज्रमुठ फाऊंडेशन हे प्रभावी माध्यम आहे,या कृतीला तोड नाही तुम्हाला तुमचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे सर्वच संघटना,पक्षीय सदस्यांना एकमेव पर्याय आहे.तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार. पेराल ते उगवेल.मेहनत केल्याने फळ मिळते निसर्गाच्या नियमाप्रमाणे वाटचाल करा यश तुमचे आहे.
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.

