Untitled design
0%
Loading ...
loader image

वाढदिवसानिमित्त घोडवली शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI

अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
असे असताना हल्ली केक कापून नको त्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅडही वाढत आहे. मात्र कुठल्याही गोष्टीला उपक्रमशीलतेची जोड देऊन त्यातून नवीन फायदा निर्माण केल्यास तो सर्वांसाठी एक वेगळा आदर्श ठरू शकतो.
असाच एक वेगळ्या आदर्शाचा पांयडा सामाजिक कार्य आणि उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे युवा वज्रमुठ फाऊंडेशन चे कार्यकारणी सदस्य श्री.राकेश भाऊ घडशी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेंच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून व सचिव श्री.दिनेश भाऊ आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्राथमिक विदयालय घोडवली ता.संगमेश्वर या शाळेला भेट देऊन येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेंच खाऊ वाटप केले.

सदर कार्यक्रमास या विद्यालयाचे मुख्याधापक श्री.संतोष जोशी सर व त्यांचे सहकारी शिक्षक श्री.संदीप मोहिते सर,सौ. स्मिता यादव मॅडम आदी उपस्थित होते.

तसेच फाऊंडेशन चे सदस्य संदीप मांडवकर, संदेश मांडवकर, महेश मांडवकर, अनिल मांडवकर, स्वप्निल मांडवकर, महेश मांडवकर उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.