Untitled design
0%
Loading ...
loader image

वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

➡ आज युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यकरणी सदस्य शुभम भाऊ घडशी तसेच निलेश भाऊ पडेळकर यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता, फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. गुणवंत भाऊ जाधव यांचा संकल्पनेतून व महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री. दिनेश भाऊ आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यामध्ये नाणीज गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज न.१ येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप तसेंच मोफत खाऊ करण्यात आले. फाउंडेशनच्या उपक्रमानुसार सदर कार्यक्रम घेण्यात आला. सध्या बाजारात शालेय साहित्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, अशातच विद्यार्थ्यांच्या पालकांना चालू शैक्षणिक वर्षात थोडयाप्रमाणात का होईना शैक्षणिक भार कमी व्हावा म्हणून हा उपक्रम आम्ही आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो.

⏺सदर कार्यक्रमास या विद्यालयाच्या
सौ. निशा बेंडल(शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष)
⏺ श्री. श्रीराम दाणी(शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष )
⏺ सौ.स्मिता बाबासाहेब पाटील व श्री.मनोजकुमार मोहन खानविलकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

तसेच फाऊंडेशनचे सदस्य मंथन घडशी, सुजल गावडे, सुरज हतपले, किशोर हतपले, आर्यन सावंत उपस्थित होते.