Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI
वाढदिवसानिमित्त ऐकीकडे अवाढव्य खर्च होत असताना संगमेश्वर तालुका मधील युवा वज्रमुठ फाउंडेशनचे सदस्य श्री.सुयश भाऊ कांबळे यांनी आपला भाऊ म्हणजेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री.सुयोग भाऊ कांबळे यांचा सामाजिक कार्याचा वसा हाती घेत युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेंच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशवंत प्राथमिक शाळा रत्नागिरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या सुशोभीकरणासाठी लागणारी झाडे देखील यावेळी भेट म्हणून देण्यात आली.
सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक तसेंच किरण कांबळे सर उपस्थित होते.
गावातील पालक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेंच फाऊंडेशन चे सदस्य सौरभ कांबळे,अभिषेक जाधव,ऋषभ कांबळे,यश कांबळे,तन्मय यादव,सुदीप कांबळे,प्रथमेश साळवी,योगपाल कांबळे,श्रद्धा बिरवाडकर यांनी देखील उपस्थित राहून मोलाचें सहकार्य केले.