Ii युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य iI
आज रत्नागिरी जिल्हा मधील लांजा तालुका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, वेरवली बुद्रुक शाळेमध्ये युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उपस्थित
▶ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वेरवली बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.आदेश अनंत जाधव.
▶मुख्याध्यापक सौ. साक्षी पडवणकर. स.शिक्षक सौ. सुप्रिया कानडे.
▶बौद्धगाव पोलिस पाटील अंगणवाडी कर्मचारी करळकर बाई व ग्रामस्थ बुधाजी कांबळे.
आदी सर्व उपस्थित होते.सदर कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साजरा करण्यात आला निकालाबरोबर मुलांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.तसेंच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांनी श्री. सचिन भाऊ लोंढे व श्री.गुणवंत भाऊ जाधव यांचे व फाऊंडेशन चे आभार मानले.