देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे गीत गावे…”
या प्रेरणादायी ओळींचा अनुसर करत युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे तसेंच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव श्री.दिनेश भाऊ आग्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श फॉर हेल्प थेरपी सेंटर,रत्नागिरी येथे भेट देऊन येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेंच खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.असे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये उद्दिष्ट हेच की, अशा मुलांना गुणवत्तापूर्ण साहित्य मिळावे आणि शिकताना न्यूनगंड वाटू नये.
सदर कार्यक्रमांस या सेंटर च्या फाऊंडर आणि डायरेक्टर सौ.प्रिया गांधी मॅडम, पालक सौ.जोशी तसेंच या मुलांना आवडीने शिकवायला येणारा व सेंटर ला टेक्निकल मदत करणारा कु.अर्णव गौरव गांधी आदी उपस्थित होते.
तसेंच फाऊंडेशनचे सदस्य राहुल मांडवकर, रोहित भितले, प्रथमेश खाके, मंथन घडशी, दीपेश कांबळे, साहिल कदम आदी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली