आज शाळा प्रभानवल्ली येरडवाडी ता. लांजा या शाळेमध्ये युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे फाऊंडेशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शाळेतील शिक्षक श्री.संतोष जाधव सर तसेंच विद्यार्थी व पालक यांनी पार पाडली.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विविध प्रकारची झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती.शाळेतील विद्यार्थी,पालक तसेंच शाळेतील शिक्षकवृंद या सर्वांनी मिळून वृक्षांचे रोपण केले.यानंतर रोपांची लागवड केल्यानंतर त्यांना पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी रोपांना कठडे बांधण्यात आले.
यानंतर श्री.संतोष जाधव सर यांनी झाडांचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडांचे अनन्य साधारण महत्व कसे आहे यावर दोन शब्द व्यक्त केले.तसेंच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देखील सर्वांना देण्यात आला. वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले. तसेंच सर्वांनी किमान एक झाड लावावे अशी विनंती करत कार्यक्रमांची सांगता केली.

