Untitled design
0%
Loading ...
loader image

शाळा प्रभानवल्ली येरडववाडी ता.लांजा जिल्हा रत्नागिरी या शाळेत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त युवा वज्रमुठ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सचिन भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गुणवंत भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या सर्व मुलांना वही व पेन हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री.अभिजित भाऊ लोंढे तसेंच महाराष्ट्र राज्याचे खजिनदार श्री.अभिषेक भाऊ डाफळे यांचे मुलांप्रती प्रेम बघता सदर कार्यक्रमांस आर्थिक हातभार लावून सामाजिक क्षेत्रातील आपली आवड जोपासली व मुलांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष जाधव गुरुजी,सहकारी शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांना अभ्यासाची ओढ निर्माण होऊन सातत्याने सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहिली पाहिजेत.यासाठी युवा वज्रमुठ फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक जाधव गुरुजी यांनी केले.