युवा वज्रमुठ फाऊंडेशन समित्यांचे संक्षिप्त स्वरूप:
1. कार्यकारणी समिती
मुख्य राज्य कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रमुखांच्या शिफारसीने नियुक्त सदस्यांची निवड करेल. संपूर्ण कोकण व महाराष्ट्रभर कार्यकारिणी सदस्य राहतील.
2. विभागीय अध्यक्ष
प्रत्येक जिल्ह्यात विभागीय अध्यक्ष नियुक्त केले जातील, जे जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रमुखांच्या कार्याचे निरीक्षण करतील व शिफारसी देतील.
3. जिल्हा अध्यक्ष
जिल्हास्तरीय समितीचे नेतृत्व करणार. 15 सदस्यांची जिल्हा समिती तयार करेल व सर्व तालुक्यांशी संवाद ठेवेल.
4. जिल्हा संपर्क प्रमुख समिती
प्रत्येक तालुक्यातून सदस्य घेऊन किमान 11 लोकांची संपर्क समिती तयार केली जाईल. तालुक्याचे संपर्क प्रमुख नियुक्त होतील.
5. जिल्हा संघटन समिती
प्रत्येक तालुक्यातील संघटन प्रमुखांच्या मदतीने किमान 11 कार्यकर्त्यांची समिती तयार होईल.
6. तक्रार निवारण समिती
किमान 11 कार्यकर्त्यांसह जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती कार्यरत राहील. कोणत्याही अन्यायाविरोधात योग्य कारवाई करेल.
7. महिला आघाडी
किमान 11 महिलांची जिल्हा महिला समिती तयार केली जाईल. तालुक्यातून महिलांच्या समस्या समजून मार्गदर्शन व मदत केली जाईल.
8. युवती प्रमुख
11 युवतींसह जिल्हा युवती समिती तयार केली जाईल. तालुक्यातील युवती प्रमुखांची नियुक्ती केली जाईल.
9. युवक प्रमुख
11 युवकांची जिल्हा युवक समिती तयार केली जाईल. तालुका स्तरावर युवक प्रमुखांची नियुक्ती केली जाईल.
10. कायदे सल्लागार समिती
11 वकिलांसह कायदेविषयक मदत व मार्गदर्शनासाठी ही समिती कार्यरत असेल. तालुक्यांतही समित्या तयार होतील.
11. आरोग्य समिती
11 डॉक्टरांसह आरोग्य विषयक सेवेसाठी ही समिती तयार होईल. तालुका आरोग्य प्रमुख नेमले जातील.
12. व्यवसाय समिती
11 उद्योजक सदस्यांमधून ही समिती तयार होईल. तालुक्यांतून स्थानिक व्यवसायिकांशी समन्वय साधला जाईल.
13. नोकरी मार्गदर्शन समिती
11 सदस्यांची ही समिती युवकांना नोकरीविषयी माहिती व मार्गदर्शन देईल. तालुकास्तरावरही समित्या असतील.
14. शिक्षक समिती
11 शिक्षकांच्या सहाय्याने ही समिती शिक्षण व पालकांशी संवाद साधेल. प्रत्येक तालुक्यात शिक्षक समिती असतील.
15. शेती प्रबोधन समिती
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी 11 सदस्यांची समिती तयार होईल. आधुनिक शेती, योजना यावर मार्गदर्शन देईल.
16. स्पोर्ट्स (क्रीडा) समिती
11 क्रीडापटूंनी युक्त समिती तयार होईल. तालुक्यांतून क्रीडा प्रमुख नियुक्त होतील.
17. सांस्कृतिक समिती
11 सदस्यांची ही समिती विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करेल. तालुक्यांमध्ये सांस्कृतिक समित्या तयार होतील.